बायकांच्या कर्तबगारीने अख्खी सत्ताच खेचून घेतल्याने हतबल झालेल्या
असाहाय्य, निकम्म्या पुरुषांची होरपळ शोधत बुंदेलखंडात केलेल्या प्रवासाची कहाणी
बुंदेलखंडातल्या धूळमातीत फिरलो, दरिद्री आयुष्यं पालथी घातली,
सगळ्या गावपाड्यांवर, वाडी-वस्त्यांवर एकच दिसलं,
बाई आणि बेरोजगारी ही बुंदेलखंडातील पुरुषांची मुख्य कमजोरी आहे.
सगळं हातून सुटत चाललेला हा पुरुष अस्वस्थ, चक्रावलेला
आणि पुरुषी गंडाच्या ओझ्याखाली पार चिरडून गेलेला!
या भागात सध्या घरातला 'पुरुष' बाईच आहे.
सगळं तीच करते.
स्वयंपाकपाणी, पोरांचं लचांड, बडेबुढे; तीच बघते.
वरून कामाला जाऊन घरात चार पैसेही आणते.
सरकार, कायदे तिच्याच बाजूने!
आपल्या पुरुषार्थाचे बारा वाजलेत हे कळून चुकलेला पुरुष
निकम्मा, कानकोंडा झालाय. त्याला दारू, नशा, पत्ते लागतात.
बेरोजगारीने तर त्याला घराबाहेरच काढलंय!
कधीच आटलेला 'पुरुषार्थ' दाखवण्यासाठी म्हणून मग तो
डरकाळ्या फोडतो, बाईला झोडतो, मारतो
केविलवाणेपणानं बाईला धमकावतो,
समाज के सामने झुकी रहे, मर्द की इज्जत ना उछाले!..
- समीर मराठे
प्रशांत खरोटे