हायवे ही त्यांची ‘गर्लफ्रेंड’ आणि पोटात माल भरलेला ट्रक ही ‘बायको’
...देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सतत धपापत धावणाऱ्या ट्रक ड्रायव्हसची जिंदगी ही एक वेगळीच कहाणी आहे.
अवघं आयुष्यच रस्त्यावर काढणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सच्या
भन्नाट जगात खोल उतरून,
त्यांच्या ट्रकमधून पंधरा दिवस- रात्री प्रवास करून,
धावत्या ट्रकच्या कलकलाटात आणि ढाब्यावरच्या डाळ-रोटीबरोबर शोधलेली
त्यांच्या अस्वस्थ जगातली रगेल, दुखरी रहस्यं
- समीर मराठे
आता गंगोत्रीच्या प्रवासात हिमालयातल्या पायवाटेवर काटक्यांची चूल मांडून लोक मॅगी शिजवतात, याचा अर्थ काय होतो?
पैलवान पोरं तालमीबाहेर रस्त्यानं दिसली की वस्ताद ओरडणार,
‘रांडंच्या वर बघून काय चाल्लाईस? खाली बघून चाल.
तुज्या बाचं लगीन हाय व्हय?’
- कचाकच शिव्या बसणार. वस्ताद लैच चिडला तर पायतान फेकून मारणार...!
दिस न् रात लाल मातीत घाम गाळायचा, कुस्ती मारायची येवढीच तुंबळ ईर्षा.
वस्तादाचा न् आबा-आज्ज्याचा ऊर भरून याय पायजे...
मैदानं भरली, पटक्याचं शेमलं उडालं, हलगी कडकडाय लागली की,
पैलवानाच्या डोस्क्यात जाळ पेटतो न शड्डू घुमतो, कडाऽऽड...
पठ्ठ्यानं कुस्ती मारली की, वस्तादाच्या शीरा तडतडाय लागत्यात...
गडी एका पायावर नाचाय लागतो...
एका रांगड्या जगाची विलक्षण कहाणी
- श्रीनिवास नागे
जेमतेम दुसरी-पाचवी पास-नापास पोरांच्या टोळ्या पॉश इंग्रजीत, टेचदार हिंदीत बोलून,
देशभरातल्या बड्याबड्यांना ऑनलाईन गंडे घालतात,
त्यांच्या जामताडा या गावात.. त्यांच्याबरोबर!
थेट अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेकांच्या अकाउंटला काही सेकंदांत
पाच-पन्नास लाखांचा चुना लावणारी पोरे
झारखंडमधल्या गल्लीगल्लीत बसून आपला ‘धंदा’ चालवतात.
सीम कार्डे एटीएम कार्डे हॅक करून बँकेची खाती खाली करण्याचे इंगित
या ग्रामीण पोरांना कसे गवसते?
फाडफाड इंग्लिशमध्ये खोटे कॉल्स करून
शहाण्यासुरत्या शिक्षित माणसांना गंडा घालणे त्यांना कसे जमते?
- झारखंडमधल्या जामताडा आणि आजूबाजूच्या गावांत भटकंती करून शोधलेली थरारकथा
- कुंदन पाटील
शहरात वाढलेले एक सुस्थितीतले तरुण जोडपे आदिवासी लोकांबरोबर राहायला त्यांच्या जगात जाते, या निर्णयाला २३ वर्षे उलटून गेल्यानंतरचा जमाखर्च
रानावनात राहणाऱ्याला अडाणी म्हणणे हा शहरी शहाण्यांचा खास मॅकोलेवांशिक आजार आहे, हे जंगलातले लोकच शिकवतात.
त्यांच्याबरोबर राहताना, जेवता-खाताना, लढे लढताना घेतलेल्या अनुभवांची, शिकलेल्या शहाणपणाची, कमावलेल्या ‘श्रीमंती’ची कहाणी
- मिलिंद थत्ते
ते फक्त दिल्ली-मुंबईतच नाहीत, अगदी कोल्हापूर-जळगावातसुद्धा असतात हल्ली!
- जिगोलो!!
एकट्या स्त्रियांना सर्व प्रकारची सोबत विकत देणारे पुरुष!...
कसे आहे त्यांचे जग?
एकसाची उपभोगाला कंटाळलेल्या हाय प्रोफाईल श्रीमंत बायका-मुलींपासून
संसारातला ‘रस’ हरवलेल्या मध्यमवर्गीय गृहिणींपर्यंत;
एकेकट्या स्त्रियांच्या शरीराची आणि मनाची भूक भागवून पैसे कमावणारे
‘जिगोलो’ कोण असतात? कुठे भेटतात? काय सांगतात?
- मनोज गडनीस
करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या अमली पदार्थांच्या धंद्याच्या साखळीतला शेवटचा माणूस म्हणजे ड्रग पेडलर!
ते सगळीकडे ‘असतात’, पण‘दिसत’ नाहीत! मुंबईतल्या एका वेगळ्या ‘अंडरवर्ल्ड’मध्ये रात्रीची भटकंती
मुंबईत तुम्ही जिथे कुठे असाल, तिथे दहा मिनिटांत हवा तो ‘माल’ पोचता करणारे
ड्रग पेडलर्स ही शहराच्या रक्तातून धावणारी समांतर छुपी दुनिया!
गुगल लोकेशन पाठवायचं फक्त... ऑर्डर केलेला पिज्झा काय येईल,
इतक्या फटाफट ‘सबस्टन्स’ पोचलाच समजा!
कायद्याला फाट्यावर मारून बेलगाम फोफावलेल्या
ड्रग पेडलर्सबरोबरची भटकंती
- रवींद्र राऊळ
जे नाही ललाटी, ते लिहील तलाठी अशी एक म्हण आहे.
पूर्वी करवसुलीला लगान म्हणत. हल्ली तलाठ्यांना लॉगिन करावे लागते.
लगानपासून लॉगिनपर्यंत पोहोचलेल्या तलाठ्यांच्या सुखदु:खांचा सातबारा
जल, जंगल, जमीन राखण्याची जबाबदारी तलाठ्याची.
पोलीस माणसांचे संरक्षण करतात. तलाठी जमिनींचे!
जमिनीवर लक्ष ठेवायचे. जमिनीच्या भूगर्भातील खनिज
चोरीला जात असेल तर तेही पाहायचे.
नद्या, नाले सुरक्षित ठेवायचे. नद्यांतील वाळू जपायची.
वर आकाशावरही लक्ष ठेवायचे.
कारण पाऊस कमी पडला तर दुष्काळाचे पंचनामे अन्
अधिक पडला तर अतिवृष्टीचे!
आकाश आणि जमीन या मधल्या पोकळीत तलाठी भाऊसाहेब असतात.
जे दोघांकडेही नजर ठेवतात.
पण, बऱ्याचदा तेच कार्यालयावाचून निर्वासित असतात.
कायदा सुवस्थेबाबत अहवाल देण्यापासून तेनैसर्गिक आपत्तीपर्यंत बहुतांश जबाबदाऱ्या तलाठ्याकडेच!
गावातील जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा हिशेब ठेवण्याचे काम तलाठ्याचे.
पाचेक हजार खातेदारांमागे एक तलाठी. पण त्याच्या कार्यालयाचा खर्च भागवण्यासाठी
सरकार त्यांना साधी टाचणीही देत नाही.
शिव्याशापाबरोबरच कौतुकाचाही धनी ठरलेल्या तलाठ्यांची कहाणी
- सुधीर लंके
आता गंगोत्रीच्या प्रवासात हिमालयातल्या पायवाटेवर काटक्यांची चूल मांडून लोक मॅगी शिजवतात, याचा अर्थ काय होतो?
अवघ्या शंभरेक वर्षांपूर्वी आपल्याकडे चहा पिणे हे ‘पाप’ गणले जात होते,
मिसळ तुच्छ असल्याने ‘चोरून खाण्या’चा पदार्थ होता,
बिस्किटे ही धर्म बुडवू शकणारी गोष्ट होती! .. आणि आता?
इटलीतून आलेले पिझा आणि पास्ता हे पदार्थ
लिट्टी चोखा या बिहारी किंवा गुश्तबा या कश्मिरीकिंवा वटकुळंबू या तमिळी पदार्थांपेक्षा
आपल्या जास्त ओळखीचे असतात, असं का होतं?
- भारतीय खाण्याचं जागतिकीकरण, सपाटीकरण, आणि मॅकडोनल्डायझेशन!
अख्खे जगच स्वयंपाकघरात शिरल्यावर बदलून गेलेली भारतीय खाण्या-पिण्याची गोष्ट!
- चिन्मय दामले
दिल्लीजवळ गुरुग्राममध्ये एक ताजे-ताजे कोट्यधीश आहेत.
त्यांनी एका एजन्सीला काय काम दिले असेल? -
रॉजर फेडररची सही असलेली टेनिसची रॅकेट विकत मिळवून द्यायची,
वाट्टेल ती किंमत मोजून! - भारतातले हे नवश्रीमंत कोण आहेत?
जागतिकीकरणानंतरच्या भारतात ‘बिलेनिअर्स’ आणि ‘मिलेनिअर्स’ उगवण्याचा वेग वाढतोच आहे.
पहिल्या पिढीत इतकी अचाट श्रीमंती पाहिलेल्या या कोऱ्याकरकरीत धनाढ्यांचे
-हाय नेटवर्थ इंडियन्सचे- जग कसे आहे?
त्यांची मौजमजा, चिंता, ताणतणाव, मूल्ये आणि संघर्ष यांची
कधी न सांगितली गेलेली कहाणी
- मृदुला बेळे
प्रत्येक भारतीय स्त्रीला लिपस्टिक लावायच्या मोहात पाडा.
तुम्हांला हवा तो विकासदर भारतात गाठता येईल!'
- याचा अर्थ काय होतो?
इतरत्र कुठेही 'कॅज्युअल लीव्ह' नावाचा प्रकार नाही.
भारतातच तो का आहे?
भारतीय कर्मचाऱ्यांचे आई-बाप स्वतंत्रपणे वृद्धाश्रमात का राहत नाहीत?
तुम्ही लोक अजून हाताने का जेवता?
टीम मिटिंग्जमध्ये चुकांचे विश्लेषण केले की भारतीय मॅनेजर/इंजिनिअर अस्वस्थ का होतो?
तुमच्या शिक्षणपद्धतीत एरर मॅनेजमेंट शिकवली जात नाही का?
- असे प्रश्न परकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना भारताबद्दल का पडतात?
बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे 'इंडिया सेन्सिटायझिंग' करणाऱ्यां तज्ज्ञ नजरेने उलगडलेले रहस्य.
- वैशाली करमरकर
‘भारत-पाकिस्तानच्या फाळणीत परस्परांना दुरावलेल्या लोकांच्या जखमांवर
आयुष्याच्या संध्याकाळी तरी खपली धरावी म्हणून त्यांच्या नातवंडांनी
सुरू केलेल्या विलक्षण प्रयत्नांची कहाणी
फाळणी झाली, तेव्हा सीमेच्या या आणि त्या बाजूच्या अनेकांनी
नेसत्या वस्त्रानिशी एक महाभयंकर प्रवास केला.
अनेकांनी डोळ्यांदेखत राहतं घर लुटताना पाहिलं,
बलात्कार झालेल्या बायका-मुलींचे मृतदेह अंगणात पुरून
उरलेल्या कच्च्याबच्च्यांसह लोकांनी रातोरात गाव सोडला.
... सर्वस्व लुटलेल्या अवस्थेत रक्ताळल्या मनाने पुन्हा आयुष्याची सुरुवात केली.
अपार कष्ट करून जीव तगवला...पण आता
पाऊण शतकापूर्वीचा राग, तिरस्कार मनातून निवळून गेला आहे.
आता अनेकांना वाटतं, मागे सोडून आलो ते सीमेपल्याड राहून गेलेलं घर, पुन्हा दिसेल का?
लहानपणीची दुरावलेली सहेली पुन्हा भेटेल का?
जन्मभूमीच्या त्या मातीचा वास पुन्हा उरात भरून घेता येईल का?
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन डोळ्यांना लावलेल्या हेडसेटमधून
सीमेपल्याडच्या मातीचा वास उरात भरून घेण्याच्या धडपडीची विव्हल कहाणी
- शर्मिला फडके
भूतकाळ फाट्यावर मारून फक्त भविष्याशी ‘कनेक्ट’ व्हायला निघालेल्या भारतातला
‘यंग इंडिया’ घाईत आणि मोकाट असला,
तरी काहीसा ‘टेंशन’मध्येही!
का?
भारतातल्या मध्यमवर्गाच्या पोटी जन्मलेली भाग्यवान,संपन्न, शहरी मुले
टीनएजमध्ये थेट बरिस्ताच्या अड्ड्यावरच पोचली!
खेडोपाडीच्या अनेक उरल्या-सुरल्यांना ‘देसी, भुक्कड, लो क्लास, पैजामाछाप क्राऊड’ ठरवून
‘इंडिया’ने लाथ मारली!- त्यांच्याकडे ना बापाचा पैसा, ना बरे शिक्षण,
ना बुडाखाली गाडी, ना आयती तयार संधी, असा सगळा ‘नन्ना’च!
-ही भारतातल्या जनरेशन ‘झेड’ची दोन टोके! त्यांच्यामध्ये लटकलेलेही कित्येक!
पण ही पोरे कशीही, कुठलीही असली; तरी सन २००० पूर्वीच्या भारतात काय घडले
याच्याशी त्यांचा शून्य संबंध आहे. त्यांना मंदिर-मंडलशी काही घेणे नाही!
मिळालेले असो, ओरबाडलेले असो; स्वातंत्र्यआहे! ‘सेक्स’ आहे!
... पण म्हणजे, त्यांच्या जगात प्रश्न नाहीत; असे मात्र नाही!!
आईबापांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांना तोंडावर पाडणाऱ्या एका अख्ख्या पिढीची कहाणी
- संजय आवटे
घनदाट जंगलात तंगडतोड करत, डोंगर चढत, दरीत उतरत
गावपाड्यांतल्या पोटुशी बायकांना, लेकरा-बाळांना
मायेच्या पदराखाली घेणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या बरोबर
सातपुड्यातले दहा दिवस आणि नऊ रात्री
गावखेड्यातल्या बायकामुलांच्या आरोग्याची जबाबदारी असलेली
ही ‘आशाबाई’ काय करीत नाही ते विचारा!
आपली दुधपिती पोरं घरी सोडून अडल्या गर्भारशीला घेऊन मध्यरात्री
पीएचसीला पळा, तिथे बाळंतिणीच्या खाटेखालीच रात्री काढा,
सतरा रजिस्टरांचं ओझं पाठीवर मारून दिवसरात्र फिल्डवर हिंडा,
पोटुशा बायकांना औषध-गोळ्या वाटा, रक्त-लघवी-थुंकी तपासा, वजनं घ्या
हजार प्रकारची माहिती जमवा, रजिस्टरं रंगवा, लस द्या, झेंडे वाटा
आणि वरनं जराशीक हिकडंतिकडं झालं, की बोलणी खा!
पुरुषांशी मान वर करून बोलण्याची हिंमत नसलेल्या या बाया
आशा झाल्या की घरोघरी जाऊन ‘निरोध कसा वापरावा’, हे शिकवतात!
गावखेड्यात सरकारचा ‘चेहेरा’ असलेल्या चिवट ‘आशा वर्कर्स’च्या जगात!
- शर्मिष्ठा भोसले
अंथरूण पाहून(च) पाय पसरण्याची जुनी सवय भारताने कधी सोडली?
‘पैसा’ या गोष्टीकडे नाक मुरडून कुत्सित नजरेने पाहाणे कोणी थांबवले?
बायकोची बांगडी मोडून शेअर खरेदी करण्याला
प्रतिष्ठा देणाऱ्या लोकांच्या जगात
पैशाची बस चुकलेल्या लोकांनी बनवलेल्या ‘पैसा हा व्यर्थ आहे’ छाप
तत्त्वज्ञानाच्या फार नादी न लागता जे उदंड पैसा कमावतात आणि
तो कारणी लावणेही जाणतात असे लोक कोण असतात?
त्यांना ही ऊर्जा कुठून मिळते?
-नवीकोरी बोइंग विमाने ऑर्डर केल्यावर राकेश झुनझुनवाला म्हणाले होते,
‘मैं पागल नही हूं, इंडिया की स्टोरीपे भरोसा है मेरा!’
-मंदार भारदे
पंच्याहत्तरपैकी गेली पन्नासहून अधिक वर्षे बदलत्या भारतातल्या
अतिश्रीमंतांचे जगणेवागणे बारकाईने पाहणाऱ्या नजरेला
कोणते बदल दिसतात?
बॉलीवुड असो, क्रिकेट असो, कन्स्ट्रक्शन असो वा अन्य काही,
पैसा आणि प्रसिद्धी यांच्या कॉकटेल्सची गुंगी वाढली, कपड्यांचे ब्रँड्स बदलले,
एंजॉयमेंटच्या कल्पना-गरजा बदलल्या, प्रवासाची ठिकाणे बदलली,
महत्त्वाकांक्षा आकाश भेदून पार पलीकडे गेल्या;
पण भारतातल्या नवश्रीमंतीला बेलगाम, उद्दाम वर्तनाची बेगडी झिलईही चढत गेली!
नॅनोमधून उतरणाऱ्या रतन टाटांच्या अजरामर ‘क्लास’चा साधा स्पर्शही
या नवश्रीमंतीला नाही!
- शोभा डे
मी जसा ‘दिसतो’, तसा नाही.
जितका वात्रट ‘वागतो’, तसाही नाही.
‘वात्रटपणा’चा मुखवटा चढवून असतो,
म्हणून या जगात जगू, टिकू शकतो!
इतर कुणी हात लावणार नाही असे कपडे घालून,
इतर कुणाला सुचणार नाहीत
असे चाळे करत मी वागत-वावरत असतो हे खरं आहे!
पण हे सगळं मी स्वत:च्या‘आतला’ धुमसता ज्वालामुखी बाहेर फुटू नये
म्हणून करत असतो.
तो माझा‘मुखवटा’ आहे.
तो ‘मी’ नव्हे!
- रणवीर सिंग