कृष्णाच्या थाळीतलं अन्न कधी संपत नसे म्हणतात.
मी अशाच एका स्वयंपाकघरात पोचले होते.
हुबळी आणि धारवाड या दोन देखण्या गावांच्या मध्ये
आशिया खंडातलं हे सर्वांत मोठं आणि
अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे.
इथं रोज सकाळी 12000 ते 15000 किलो गरमागरम भात शिजतो.
तब्बल 25 हजार लिटर सांबार तयार होतं.
