..शेवटी सीमापार लाहोरच्या मिट्टीमध्ये रुजली त्यांची गजल; पण फाळणीनं ताटातूट केलेले कोलकात्याचे महकते गली-मोहल्ले कधी विसरता नाही आले त्यांना. ‘हिंदुस्थानसे न्यौता है’ म्हटल्यावर डोळ्यांत पाणी येऊन त्या म्हणाल्याही ‘दीपोत्सव’ला, ‘अगर आ सकते आप, हमारे घर; तो चैनसे बैठते, बाते करते..’
– पण किती कठीण ती भळभळती सीमा ओलांडून पलीकडे जाणं!
म्हणून मग फोनवरच्या दीर्घ गप्पांमध्येच उलगडली त्यांच्या रईसी जिंदगीची दुखरी दास्तां.. आणि ते स्वर. आज जानेकी जिद ना करो!