सोलापूर-बार्शीकडल्या तरुण पोरांनी यू टय़ूबवर नुस्ता धुरळा उडवलाय. डोनाल्ड ट्रम्पला तात्या बनवून गायछाप मळायला लावलीय त्येंनी. ह्यो ट्रम्पतात्या फेटाबिटा घालून गप्पा हाणतूय कशावरबी. त्येंच्या निक्की जिगरनं आपल्या टोप्या उडवाव्यात म्हणून पुन्यामुंबैकडल्या शिनेमावाल्यांची रांग लागलीय..
सातारकडच्या पोरांनी तर गावाकडच्या वेबशिरीजमध्नं पार काळजालाच हात घातलाय, वर ही पोरं पैसंबी कमवाय लागल्यात!
ह्या पोरांच्यात ओबामा भाऊ खास्बागेत मिस्सळ खायाला जात्यात आणि मिशेल वैनीबी रस्सा वाडा म्हन्त्यात!