मोय कोने, आमी कोने?

Optimized-Assam citizenship NRC-003

अख्ख्या आसाम राज्यातल्या नागरिकांना व्यवस्थेनं परीक्षेला उभं केलं आहे.
त्यांना विचारले जाणारे प्रश्न अनेकांच्या जुन्या जखमांवरच्या खपल्या काढणारे आहेत. ‘तुम्ही भारतीय नागरिक आहात का? कशावरून? असाल तर पुरावे दाखवा!’
- पण हे मनाला लावून न घेता आसामी माणसं आपल्या रहिवासाचे पुरावे घेऊन गेले कित्येक महिने ‘एनआरसी’च्या रांगेत उभी आहेत.
त्यांचं म्हणणं, पुरावे हवेत ना, घ्या! पण आता बाहेरून घुसलेल्या लोकांना हाकलून काढा. आमच्या ताटात हे उपरे,परके भोजनभाऊ नकोत आता!
- हे नेमकं काय आहे? अस्वस्थ करणाऱ्या  प्रश्नांच्या आणि माणसांच्या शोधात आसाममधले दिवस आणि रात्री!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *