एक अमृता पूर्ण बेफिकीर, टोकाची वादग्रस्त मतं बाळगणारी, बेधडक विधानं करणारी,
प्रेमप्रकरणं, स्कॅन्डल्स ह्यांना जन्म देणारी, स्वच्छंद, फुलपाखरी वृत्तीची.
दुसरी अमृता आत्ममग्न, संकोची, वैयक्तिक नातेसंबंधांच्या जाळ्यात गुरफटून गेलेली,
आपल्याला कोणीच समजून घेत नाही असं मानणारी, सोलमेटच्या शोधात सैरभैर झालेली,
आपल्या वडिलांचं आपल्याबद्दलचं मत चांगलं राहावं याकरता धडपडणारी.
तिसरी अमृता बेबंद लैंगिक संबंधांमधून निर्माण झालेलं अनारोग्य, गर्भपात यांनी ग्रासलेली, निराशावादी.
एकामागोमाग एक जोडीदारांकडून शारीरिक संग उपभोगल्यावरही
मानसिक प्रेम न गवसलेली अनाघ्रात अमृता.