फास्ट
अखंड पळत राहा, सतत सतत नवे शिकत राहा,
माहिती शोधत राहा, टार्गेट कम्प्लीट करा,
लाईक-शेअर-सबस्क्राईब करा,
हे आपले काय चालले आहे? आणि का?
आपण असे कधीपासून धावायला लागलो?
आपल्या आयुष्याला वेगाची आग लागली आहे,
जळत जळत आपली राख होते आहे,
याचे भान आपल्याला आहे का?
- विश्राम ढोले