रोख मदत मिळताच पोटाला अन्न न घेता गरीब लोक टीव्ही का विकत घेत असतील, अशा प्रश्नांनी अस्वस्थ होऊन जगभरच्या गरीबांमध्ये राहिलेल्या, त्यांच्या जगण्यात खोल शिरणाऱ्या नोबेल विजेत्या जागतिक अर्थतज्ज्ञाशी सविस्तर संवाद : मराठीत प्रथमच!
लहानपण गेलं कलकत्त्याच्या उच्चभ्रू वस्तीत.
पण जिभेवर थालीपीठाची चव अजून आहे, कारण आई मराठी!
गेली तीसहून अधिक वर्षं जगभरातल्या गरिबांबरोबर भटकून ‘गरिबी’ची कारणं उलगडता उलगडता त्यांना सापडत गेली मानवी स्वभावाची आणि स्वप्नांची अनेक रहस्यं! लोक गरिबीत का ढकलले जातात ? ते तिथेच का खितपत पडतात ?
स्वतःच्या बळावर ते गरिबीतून बाहेर येऊ शकतात का ?
जगभरातल्या सगळ्या गरीबांची स्वप्न सारखीच असतात का ?
बिहारमध्ये राहाणारा गरीब माणूस हा बोस्टनमध्ये राहाणाऱ्या गरिबांपेक्षा बराच बारा आहे, तो का ?
- गरिबीची कारणं आणि या प्रश्नाची गाठ सोडवण्याच्या मुळाशी जाणाऱ्या' नोबेल विजेत्या जागतिक अर्थतज्ज्ञाशी सविस्तर संवाद
- अपर्णा वेलणकर
घरात कोंडून पडलेल्या कलाकाराच्या मनात वाजणाऱ्या वेदनेच्या संगीताबद्दल दिलखुलास गप्पा!
रस्त्यावरून भोंगे वाजवत जाणाऱ्या रुग्णवाहिकांची वर्दळ लवकरच संपेल, भयाचे, निराशेचे सावट ओसरत जाईल, आणि रंगमंच झाकणारे पडदे दिमाखात दूर होतील...
तेव्हा समोर बसलेले कलाकार काय ऐकवतील?
- मला वाटते, या अनुभवातून तावूनसुलाखून निघालेले नव्या जगाचे संगीत असेल ते!
दु:खाचे तीव्र तडाखे आणि वेदना यांवर मात करीत निर्माण झालेले, नव्या जगाचे संगीत!!
जेव्हा काहीच दिसेनासे होते, तेव्हा कलाकाराने निमूट साधनेला शरण जावे.
मी आज त्याच वाटेवर उभा आहे!
- उस्ताद झाकीर हुसेन
विश्वविख्यात छायाचित्रकार केकी मूस पन्नास वर्षं स्वेच्छेने ‘क्वारंटाईन्ड’ आयुष्य जगले! सोबत कुत्रे, मांजरं, चित्रं, फोटो आणि दुरावलेल्या प्रेयसीची वाट पाहात मध्यरात्री धडधडत जाणाऱ्या कलकत्ता मेलसाठी टक्क जागत बसलेलं काळीज! चाळीसगावच्या हवेलीतल्या त्या गूढ आठवणींचं कुलुप उघडणारा थरारक लेख
चाळीसगाव रेल्वेस्टेशनच्या जवळचं ‘रेम्ब्राज रिट्रीट’!
खिळे ठोकून सगळ्या खिडक्या बंद केलेल्या या हवेलीत एका अवलियानं स्वत:ला कोंडून घेतलं होतं... सुमारे पन्नास वर्षं!
विश्वविख्यात छायाचित्रकार ‘केकी मूस’ हे त्याचं नाव. ‘कलकत्ता मेलनं मी एके रात्री चाळीसगावला येईन...कायमची’ असं ‘पारसी प्रॉमिस’ देऊन उडून गेलेल्या सखीची वाट पाहत या माणसानं अख्खं आयुष्य दाराच्या आत काढलं!
रोज मध्यरात्री कलकत्ता मेल धडधडत निघून गेली की थकलेले पाय ओढत हा त्याच्या भल्याप्रचंड मंचकावर येऊन पडत असे...
सोबत फक्त कुत्रे, मांजरं, पुतळे आणि पेंटिंग्जची!
बंद अंधाऱ्या हवेलीत कोंडून घेऊन चार भिंतींच्या आतच त्यानं जगाला वेड लावणारी फोटोग्राफी केली!
- दिलीप कुलकर्णी
हा अतिसूक्ष्म विषाणू इतक्या प्रगत माणसाला गुढगे टेकायला का लावतो? : गूढ जगातल्या रहस्यांचा वेध
विषाणू हा स्मार्ट प्रवासी आहे.
त्याच्याबरोबर असतो फक्त जिनोम आणि हा जिनोम गुंडाळलेली एक प्रथिनांची पिशवी.
हे इतकंच सामान घेऊन विषाणू प्रवासाला निघतो, एखाद्या भणंग बेफिकीर मुलासारखा!
पथारी टाकायला एखादी पेशी दिसली की आपल्याकडच्या बनावट किल्लीनं तिच्या दाराचं कुलूप सराईतपणे उघडायचं आणि आत शिरायचं.
एकदा आत शिरलं की या ओसरीत हातपाय पसरायला लागायचं...
हा अतिसूक्ष्म जीव हे सहजी करतो!
- यातला एक आज मानवजातीच्या जिवावर उठला आहे हे खरं; पण हे विषाणू नसतील, तर आपणही नसू!!!
अतिसूक्ष्म विषाणूंच्या गूढ जगातल्या रहस्यांचा वेध
- डॉ. मृदुला बेळे
आज तुमच्या स्मार्टफोनमधून सरकार तुमचा ‘ताप’ मोजू शकते, उद्या तुमच्या मनात काय चालले आहे यावर ‘वॉच’ ठेवता येऊ शकेल; मग काय होईल? : ‘न्यू नॉर्मल’ जगातला नवा प्रश्न
कोरोना-काळात स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या शरीराचे तापमान, रक्तदाबअशी ‘विदा’ गोळा करून जगभरच्या सरकारांनी विषाणूच्या प्रसाराचा वेग, दिशा शोधली.
बाधितांचा माग ठेवण्याच्या व्यवस्था उभारल्या.
जिवावरच बेतलेम्हणून लोकांनी अपरिहार्यतेने हा खासगीपणाचा संकोच स्वीकारला.
- हे रक्त तोंडाला लागलेल्या सरकारी व्यवस्थांनी कोरोनानंतरच्या ‘न्यू नॉर्मल’ जगात लोकांचा ‘व्यक्तिगत डेटा’ जमवून नागरिकांचे विचार आणि वर्तन यांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले तर?
‘खासगीपणा’चे मूल्य संपवून ‘पब्लिक अनलिमिटेड’ अशी आपली अवस्था करू शकणाऱ्या ‘न्यू नॉर्मल’ जगातला नवा प्रश्न
- विश्राम ढोले
कोरोनानंतरचे जग अनिश्चितता आणि अरिष्टे यांनी वेढले जाईल, त्यातून मार्ग काढणे शक्य असेल का?
कोरोनाने मानवाला दाराआड कोंडून घातल्यावर कधी नव्हे, ते अख्खे जग एकाच वेळी बंद पडले!
पण जगाची बंदीशाळा झाली, तरी जग अजून तरी कोलमडलेले नाही.
हाहाकार झाला, पण सर्व काही उद्ध्वस्त झाले नाही.
... आता मात्र यापुढे काय होईल?
व्यक्तिगत- कौटुंबिक, सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक- राजकीय जीवन अशा रितीने ढवळून निघेल, की कदाचित त्याची कल्पनाही कोणी केलेली नसेल.
अगदी कट्टर आशावादीसुद्धा मनातून हादरले आहेत.
कोरोनानंतरच्या जग अनिश्चितता आणि अरिष्टे यांनी वेढले जाईल...
पुढे काय होईल?
- कुमार केतकर
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ,पिकासोसारख्या श्रेष्ठ चित्रकारांनी महामारी, महायुध्दाच्या वेदना कशा सोसल्या? : चित्रकारांच्या व्यक्तिगत आयुष्याची भ्रमंती करून घेतलेला एक अस्वस्थ करणारा शोध
महाभयंकर साथीचे रोग, महायुद्धं, प्रलय, भुकंप, वणवे, दुष्काळ..
हे सारं खूप सोसलं आहे जगाने आजवर!
त्या काळातली दु:ख भोगलेल्या चित्रकारांनी मग काय केलं त्या वेदनांचं?
महायुद्धाचा विध्वंस रंग-रेषेत पकडणारा अस्वस्थ कल्लोळ, रेनेसान्स काळातल्या म्लान नजरा, खोल उदास रेषा, रोमॅन्टिक काळातले कातर करुण भाव किंवा आधुनिक काळातले औदासिन्याचे ठळक रंग..
चित्रकारांनी कसा रंगवला आहे दु:खाचा काळ?
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ आणि पिकासोपासून श्रेष्ठ चित्रकारांच्या काळजात रुतून बसलेल्या अस्वस्थ काळाच्या खुणा जेव्हा कॅनव्हासवर उतरतात : एक अस्वस्थ करणारा शोध
- शर्मिला फडके
कलकलाटाने भरलेल्या जगातून आपली वाट कशी शोधावी ? - प्रल्हाद पै
आपल्या मनात भूतकाळातलं अनिष्ट चिंतन असतं आणि भविष्याबद्दल चिंता काळजी.
.. हे असं का घडतं?
कारण प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा!
म्हणून सदगुरू म्हणतात, ‘स्थिर मन हे सुखाचा सागर तर अस्थिर मन हे दु:खाचं आगर आहे!’
- उत्कर्ष साधणाऱ्या , संसार सुखाचा करणाऱ्या आणि आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाणाऱ्या ‘जीवनविद्ये’चं रहस्य
- प्रल्हाद वामनराव पै
विशीतली भारतीय तरुणी बीजिंगमध्ये वास्तव्याला जाते, तेव्हा तिला ‘भेटणारा’ भिंतीपलीकडचा चीन कसा दिसतो?
एक विशीतली भारतीय तरुणी उत्सुकतेनं चीनमध्ये काम करायला जाते, तिथं तिला काय दिसतं? भेटतं?
तिचं आॅफीस, मित्र-मैत्रिणी, कोपºयावरच्या हुटॉँगमधली चिनी आजी, सरकारची ‘नजर’ चुकवून पोर्न पाहणारं-संधी शोधून वाद घालणारं तारुण्य, पबमधल्या धुंद रात्री आणि बीजिंगमधल्या खासगी जगण्याच्या रितीभाती...
चीनमध्ये राहणारे सर्वसामान्य नागरिक हे इथल्या सर्वसत्ताधीश सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे आणि कोणताही विचार न करणारे यांत्रिक ‘ड्रोन’ असणार; अशी एक जागतिक समजूत आहे; पण खरंच तसं असतं का?
- मिथिला फडके
हा देश इतका बेदरकार आणि मग्रूर का आहे? चीनची वर्तमान ‘वृत्ती ’घडवणाऱ्या सांस्कृतिक आणि वैचारिक रहस्यांचा शोध!
चीनचं वय अदमासे ४००० वर्षांचं आहे.
फंदफितुरी, छुपा कावेबाजपणा आणि बेदरकार विस्तारवाद, हे सारं चीनच्या रक्तातच मुरलेलं आहे...का?
सततची हिंसा, जुलमी राजवटी, उपासमार यांमुळे चीनची स्वप्रतिमा शरमेनी लडबडलेली असेल, त्यांच्या रक्तात गुलामी-हुजरेपण आलं असेल, असंच अख्खं जग समजत राहिलं!
चीननं मात्र ‘ढ’ असल्याचं सोंग बेमालूम वठवून कावेबाजपणे आपली ताकद वाढवत नेली आणि फणा काढला!
- हे कसं घडलं?
हा देश इतका बेदरकार आणि मग्रूर का आहे?
चीनचे आद्य धोरणकर्ते त्सून त्सू यांच्या छत्तीस सल्ल्यांमधून शोधलेलं रहस्य
- वैशाली करमरकर
शास्त्रीय गायन-वादन-नर्तन शिकायला भारतात येऊन इथल्याच होणाऱ्या परदेशी साधकांच्या भन्नाट जगात
थेट पाकिस्तानातून येऊन ध्रुपद शिकण्यासाठी गुंदेचा बंधूंच्या गुरुकुलात दाखल झालेली अलिया रशीद, भारतात रुद्रवीणा कशी बांधतात हे शिकण्यासाठी जर्मनीहून येऊन भारतात वणवण फिरलेला कर्स्टन विके विदुषी पट्टामल यांच्या पायाशी बसून ओक्साबोक्शी रडत गाणे शिकणारा मलेशियाचा चोंग, आणि थेट अन्नपुर्णादेवींकडे शिकण्याचा दुर्मीळ संधी मिळालेले आॅस्ट्रीयाचे डॅनियल ब्रैडली...
अभिजात संगीताच्या ओढीने जगभरातून भारतात धावत येणारे वेडे मुसाफीर!
गायन-वादन-नृत्याची इथली जादू मुठीत भरून घेण्यासाठी प्राण पणाला लावणारे,संगीत शिकता-शिकता इथे भारतातच घर केलेले!
इथल्या माणसांशी, वातावरणाशी, जगण्याच्या रितीभातींशी, अन्नाशी जमवून घेता-घेता कित्येकांची दमछाक झालेली दिसते;
तरीही का बांधून घेतात हे मुसाफिर इथल्या स्वर-लय-तालाशी?
भारताच्या भूमीतले स्वर-रंग आपल्या पंखांवर माखून घेण्यासाठी धडपडणाऱ्या परदेशी साधकांच्या वेड्या जगात...
- वन्दना अत्रे
तामीळनाडूतल्या एका खेड्यात राहून जगाशी व्यवहार करणाऱ्या श्रीधर वेम्बु या‘कोट्यधीश उद्योजकाने सुरू केलेल्या विलक्षण प्रयोगाची गोष्ट
हा सायकलवरचा माणूस पाहिलात? हे आहेत श्रीधर वेम्बू. १.६ बिलियन डॉलर्सचं बाजारमूल्य असलेल्या ‘झोहो’ या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक! बिलिआॅनर माणूस.
न्यूयॉर्कपासून बिजिंगपर्यंत जगभर पसरलेला कारभार, पण वेम्बू स्वत: राहातात तामीळनाडूतल्या एका खेड्यात!
सकाळी शेती करतात, मग मुलांना शिकवतात, विहिरीत पोहून झालं की वडाच्या झाडाखाली लॅपटॉप उघडून काम सुरू!
आता तर ‘झोहो’चे 500 हून अधिक इंजिनिअर्स तामीळनाडूच्या 20 खेड्यांमध्ये ‘शिफ्ट’ झाले आहेत! - नेमका काय आहे हा प्रयोग?
खेड्यात राहून जगाशी व्यवहार करणाऱ्या एका भन्नाट प्रयोगाची गोष्ट
- मुक्ता चैतन्य
पैसा, सुखं, महत्त्वाकांक्षा यांचा अतिरेक नाकारून ‘धावत्या गाडी’तून उतरून गेलेल्या सुखी लोकांच्या निवांत जगात
स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांच्या मागे सुसाट धावत सुटलेल्या गाडीतून ‘आता मी उतरणार’ असं म्हणतात काही लोक! फार पैसा नको, फार वस्तू नकोत, आयुष्याचा कब्जा घेणारी स्वप्नं नकोत, कलकलाट नको, ट्राफीकमध्ये घुसून याच्यात्याच्या पुढं जाणं नको रोज उठून आपण धावलो नाही, तर काही बिघडत नाही म्हणतात काही लोक!
मुक्त आयुष्याची चव घेत मोकळ्या आभाळाखाली शांतपणे आणि साधंसं जगायला निघाले आहेत काही लोक...
पैसा, सुखं, महत्त्वाकांक्षा यांचा अतिरेक नाकारून ‘धावत्या गाडी’तून उतरून गेलेल्या लोकांच्या जगात...
- मेघना ढोके
गावखेड्यातल्या जातीय उतरंडीतून सुटकेची आस धरणारा बिहारी ‘परक्या’ मुलखात जगायला जातो, तो का?
‘लिट्टी-चोखा’ हा बिहार-झारखंड आणि युपीच्या जिल्ह्यांमध्ये घराघरांत होणारा पारंपरिक खाद्यपदार्थ.
लिट्टी म्हणजे गव्हाच्या पिठाच्या उंड्यांमध्ये ‘सत्तू-कांदा-ओवा-जिरं-तिखट-मीठ’ यांचं सारण भरून केलेले मुटके. हे गोळे निखाºयावर खरपूस भाजून काढायचे आणि देसी घी घालून, वांगी-बटाटा-टोमेटोच्या झणझणीत भरतासोबत खायचे.
हे खास भरीत म्हणजे चोखा.
हा लिट्टी-चोखा बिहारमधून स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या संघर्षाचं प्रतीकच! गावखेड्यातल्या जातीय उतरंडीतून सुटकेची आस धरणारा बिहारी ‘परक्या’ मुलखात जगायला जातो, तो का? - याचा शोध!
- मयुरेश भडसावळे
मजुरी करायला म्हणून तरणे पुरुष महानगरांकडे धावतात, तेव्हा उत्तर भारतातल्या खेड्यांत काय उरतं?
पराकोटीचं दारिद्र्य आणि पाचवीला पुजलेली भूक.
धुरळ्यातली भकास कोरडी गावं.
तरुण पुरुष औषधाला सापडणार नाही, का?- सगळे पोटापाठी देशभर पांगलेले! गावात फक्त बायका, पोरं आणि म्हातारेकोतारे.
गावकरी कायम भयाने पछाडलेले आणि संशयग्रस्त.
मजुरी करायला म्हणून तरणे पुरुष महानगरांकडे धावतात, तेव्हा उत्तर भारतातल्या खेड्यांत काय उरतं?
- सुधारक ओलवे
उत्तर भारतातून जगायला आलेले मजूर मुंबईच्या पोटात कसे राहातात? : पायपीट करून शोधलेली कहाणी
शेतमजुरीत सडण्यापेक्षा शहरात जाऊन मेहनत करायचा जुनून डोक्यात शिरला की उत्तर प्रदेश-बिहारातून निघालेल्या पोरग्यानं गाठलीच बंबई !
गाववाल्या रिश्तेदाराकडे टकली टेकायची, मग नोकरीधंद्याची तलाश!
कुठे वडापावचा स्टॉल लाव, भाज्या वीक, आयस्क्रीमची गाडी चालव, भेलपुरी, पाणीपुरी वीक हे सुरू होतं.
कामाचं वावडं नाही. कशालाही ना नाही.
आपलं पोट भरायचं आणि गावाकडे पैसे पाठवायचे, एवढाच जगण्याचा उद्देश!
लग्नं झाली, तरी अनेकदा बायको गावी आणि हा सडा इकडे ‘भाभी’च्या शोधात! जो येतो, तो यांना आपल्या दातात धरतो, पायाखाली चिरडतो, वापरून घेतो, पण हे मोठे चिवट! मरत नाहीत...जगत राहतात! उत्तर भारतातून मुंबईत जगायला आलेल्या मजुरांच्या घुसमटल्या जगात पायपीट करून शोधलेली कहाणी
- रवींद्र राऊळ
अवघ्या जगाचं लक्ष खिळून असलेल्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून स्पेशल रिपोर्ट
पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये कोरोनावरची लस तयार होते आहे. नेमकं काय चालतं तिथे?
जगभरातल्या माणसांचे जीव वाचवण्याची क्षमता असलेल्या लसीच्या हजारो कुप्या कंव्हेनर बेल्टवरून भराभर सरकताना दिसतात; तेव्हा काय घाई चालू असते आसपास? अवघ्या जगाचं लक्ष खिळून असलेल्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून स्पेशल रिपोर्ट
- सुकृत करंदीकर