लोकमत
दीपोत्सव 2018
शोध
माणसांचा, संघर्ष अंगावर घेणारऱ्या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा,
उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा!!!
‘रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन र्जनलिझम’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेला, संपादनापासून मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करणारा आणि मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडणारा दिवाळी अंक

200 INR
Order Now Buy from Amazonअंकाचं वितरण लवकरच करण्यात येईल. आगाऊ नोंदणीसाठी इथे क्लिक करा. *
Shipping in India only
या वर्षीच्या मैफलीत भेटा…

सोनम वांगचूक
‘माणूस सोडून इतर कुठल्यातरी प्राण्याची पिल्लं बंद खोलीत एका जागी बसून शिकताना तुम्ही पाहिली आहेत का? ’ - असा विचित्र पण नेमका प्रश्न पडलेला हा अजब पहाडी माणूस लडाखमध्ये नापास मुलांची शाळा चालवतो. शाळेची इमारत बांधण्यापासून स्वत:पुरती वीज तयार करण्यार्पयत सगळी कामं इथली मुलंच करतात. शिकायचं ते कृती करून, वर्गात बसून नव्हे; असा या शाळेचा स्वभाव!
ज्याच्यावरून ‘थ्री इडियट्स’मधला फुंगसूक वांगडू जन्माला आला, तो हा माणूस फुंगसूक वांगडूपेक्षाही भन्नाट आहे!
- लडाखमध्ये त्याच्यासोबतचे चार अख्खे दिवस आणि रात्री!

मन्सूर खान
त्याचा पहिला सिनेमा ‘कयामत से कयामत तक’.
आणि दुसरा ‘जो जीता वोही सिकंदर’! करिअर सेट होती बॉलिवूडमधली.
त्यात आमीर खान सख्खा चुलत भाऊ.
- एवढं यश म्हटल्यावर एखादा कुणी वेडा झाला असता; पण मन्सूरनं सगळं सोडलं आणि एके दिवशी मुंबई सोडून, त्याचा कुत्र आणि लॅपटॉप एवढय़ा दोनच गोष्टी सोबत घेऊन तो निलगिरी पर्वतांमध्ये निघून गेला.
गेली पंधरा वर्षे मन्सूर तिथंच राहतो. त्याच्यासोबत सध्या वीसेक गायी आहेत, आणि कमीत कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त आनंदानं जगता येण्याची रहस्यं!
- मन्सूर खानच्या कुन्नूरच्या घरी जाऊन घेतलेला त्या रहस्यांचा भन्नाट शोध..

दीपिका पडुकोन
यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्याभोवती नैराश्याचे ढग दाटून आले. तिला वाटे, सकाळी उठूच नये. कुणाला भेटू नये. काही-काही करू नये! पोटात सतत भीतीचा खड्डा आणि डोळ्यांत लपवून अडवून धरलेलं पाणी!
- अखेरीस मोठय़ा मुश्किलीने ती त्यातून बाहेर पडली, आणि तिनं जाहीर सांगितलं, ‘मी स्वत: डिप्रेशनमधून गेले आहे, आणि ही लपवण्याची गोष्ट नाही!’
- त्यानंतर तिनं सुरू केला एक प्रयत्न - लिव्ह, लव्ह, लाफ फाउण्डेशन!
अंधारातून उजेडाकडे निकरानं पावलं टाकताना सोसलेल्या दिवसांची अत्यंत व्यक्तिगत कहाणी सांगते आहे स्वत:…

राहुल गांधी
काहीच सोपं नव्हतं आणि नाही या तरुणासाठी!
ना कुटुंबातल्या हत्यांनी होरपळलेल्या बालपणाचे व्रण असलेलं व्यक्तिगत जीवन,
ना चौफेर टीकेनं आणि भाडोत्री जल्पकांनी टोचून घायाळ केलेलं राजकीय जीवन!
- पण तरी तो पाऊल रोवून उभा आहे.टिकून आहे.
अस्वस्थ वर्तमानाचा सकारात्मक ‘पर्याय’ ठरू पाहातो आहे.
गेल्या काही वर्षात देशभरात केलेल्या भ्रमंतीनं शिकवलेले धडे आणि
मनात आकार घेत असलेलं नव्या, तरुण भारताचं स्वप्न यांविषयी..
मराठीतली पहिलीवहिली आणि दिलखुलास मुलाखत
मोय कोने, आमी कोने?
अख्ख्या आसाम राज्यातल्या नागरिकांना व्यवस्थेनं परीक्षेला उभं केलं आहे.
त्यांना विचारले जाणारे प्रश्न अनेकांच्या जुन्या जखमांवरच्या खपल्या काढणारे आहेत. ‘तुम्ही भारतीय नागरिक आहात का? कशावरून? असाल तर पुरावे दाखवा!’
- पण हे मनाला लावून न घेता आसामी माणसं आपल्या रहिवासाचे पुरावे घेऊन गेले कित्येक महिने ‘एनआरसी’च्या रांगेत उभी आहेत.
त्यांचं म्हणणं, पुरावे हवेत ना, घ्या! पण आता बाहेरून घुसलेल्या लोकांना हाकलून काढा. आमच्या ताटात हे उपरे,परके भोजनभाऊ नकोत आता!
- हे नेमकं काय आहे? अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांच्या आणि माणसांच्या शोधात आसाममधले दिवस आणि रात्री!
जोहरा
बायकांनी गाणं-वाजवणं दूरच, जिथे बाईचं नखही सार्वजनिक ठिकाणी चारचौघांत दृष्टीस पडणं मुश्कील; अशा बंद बुरख्याआडच्या
अफगाणिस्तानात एक नवल घडतं आहे. डॉ. अहमद सरमस्त नावाच्या एका अवलियानं तरुण अफगाणी मुलींना एकत्र करून त्यांच्या हाती
विस्मरणात गेलेली पारंपरिक अफगाणी वाद्यं ठेवली आहेत आणि तालिबान्यांनी सर्वथा निषिद्ध ठरवलेले सूर साक्षात मृत्युदंडाच्या
भीतीला, नाक-कान कापण्याच्या धमक्यांना भीक न घालता त्या मुलींच्या कंठात पुन्हा रुजत घातले आहेत..
आणि त्यासाठी काही हिमतीच्या मुलींनी शब्दश: आपले प्राण पणाला लावले आहेत;
- त्या अफगाणी मुलींशी, बॉम्बहल्ल्यांच्या झाकोळातल्या त्यांच्या आयुष्याशी प्रत्यक्ष भेट!
याशिवाय विशेष रिपोर्ताज आणि हलवून टाकणारं वास्तव…

‘भय’ सरते तेव्हा..
गडचिरोलीमधलं आणि छत्तीसगडमधलं जंगल चिरत आत गेलं की तिथला काळोखा सन्नाटा अंगावर येतो. वर्षानुर्वष रक्त-मांसाचा वास आणि नक्षली बंदुकांच्या धुरात गुदमरलेल्या या भागात अखंड पायपीट करताना जे भेटलं-दिसलं ते अजबच!! नक्षलवादाच्या विरोधात उभे राहिलेले फाटके आदिवासी, शिकून जगायला निघालेली त्यांची तरुण पोरं, बंदुकांसाठीच्या पैशातून पुस्तकं विकत घेऊन शाळांना वाटणारे सरकारी अधिकारी आणि आपल्या पुढच्या पिढीला ‘आयआयटी’च्या ‘एन्ट्रन्स’ला बसवण्यासाठी धडपडणारे खूंखार नक्षलवादी. महाराष्ट्रातल्या भामरागड, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा आणि छत्तीसगड इथल्या दंतेवाडा, सुकमा, बिजापूर या नक्षलग्रस्त भागातल्या भटकंतीतून हाती आलेले काही आश्वासक तुकडे!

मजुरांचे अंगठे जेव्हा अँपवर टेकतात..
रोजगार हमीवरल्या अशिक्षित मजुरांच्या हाती आंध्र प्रदेश सरकारनं मोबाइल फोन आणि टॅब दिले आहेत आणि त्यामुळे राज्यातली ‘व्यवस्था’च बदलू घातली आहे. चंद्राबाबूंना ही जादू कशी साधली? - आंध्र प्रदेशातल्या ‘स्मार्ट क्रांती’ची रहस्यं शोधत गावोगावी केलेल्या भटकंतीतून सापडलेल्या काही कळीच्या गोष्टी!

ट्रम्प तात्या, ओबामा भाऊ आन मिश्शेल वैनी
सोलापूर-बार्शीकडल्या तरुण पोरांनी यू टय़ूबवर नुस्ता धुरळा उडवलाय. डोनाल्ड ट्रम्पला तात्या बनवून गायछाप मळायला लावलीय त्येंनी. ह्यो ट्रम्पतात्या फेटाबिटा घालून गप्पा हाणतूय कशावरबी. त्येंच्या निक्की जिगरनं आपल्या टोप्या उडवाव्यात म्हणून पुन्यामुंबैकडल्या शिनेमावाल्यांची रांग लागलीय..
सातारकडच्या पोरांनी तर गावाकडच्या वेबशिरीजमध्नं पार काळजालाच हात घातलाय, वर ही पोरं पैसंबी कमवाय लागल्यात!
ह्या पोरांच्यात ओबामा भाऊ खास्बागेत मिस्सळ खायाला जात्यात आणि मिशेल वैनीबी रस्सा वाडा म्हन्त्यात!

मोय कोने, आमी कोने?
अख्ख्या आसाम राज्यातल्या नागरिकांना व्यवस्थेनं परीक्षेला उभं केलं आहे.
त्यांना विचारले जाणारे प्रश्न अनेकांच्या जुन्या जखमांवरच्या खपल्या काढणारे आहेत. ‘तुम्ही भारतीय नागरिक आहात का? कशावरून? असाल तर पुरावे दाखवा!’
- पण हे मनाला लावून न घेता आसामी माणसं आपल्या रहिवासाचे पुरावे घेऊन गेले कित्येक महिने ‘एनआरसी’च्या रांगेत उभी आहेत.
त्यांचं म्हणणं, पुरावे हवेत ना, घ्या! पण आता बाहेरून घुसलेल्या लोकांना हाकलून काढा. आमच्या ताटात हे उपरे,परके भोजनभाऊ नकोत आता!
- हे नेमकं काय आहे? अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांच्या आणि माणसांच्या शोधात आसाममधले दिवस आणि रात्री!

‘लाल पट्टा’
रक्त-मांसाचा वास आणि नक्षली बंदुकांच्या धुरात गुदमरलेल्या भामरागड, आलापल्ली, अहेरी, दंतेवाडा, सुकमा, बिजापूर इथल्या जंगलात भेटलेलं नवं जग बदलतं आहे..
बदनाम ‘रेड बेल्ट’मधल्या पायपिटीत सापडलेले आशेचे दुवे!

‘उत्तरे’पासून दूरची ‘दक्षिण’
शिजवलेल्या अन्नात वळवळणारे जिवंत जीव दिसतात. शहरात कोटी लोक राहतात; पण रस्त्यावर माणसं दिसत नाहीत. चौकात निदर्शनं होतात; पण विरोधाचा शब्द फुटत नाही. अधिकारी लोक ‘तपशील’ देतात; पण ‘माहिती’ दडवतात..
सीमेच्या अलीकडे-पलीकडे आवळे-जावळे देश राहातात; पण एकमेकांकडे ढुंकून पाहात नाहीत..
- दक्षिण कोरियाच्या प्रवासात भेटलेल्या एका घट्ट ओठांच्या रंगीन जगाची थक्क करणारी कहाणी!

स्वप्नांचं गॅस चेंबर
‘मला विचार, मी सगळी जवानी राख करून टाकली त्या यूपीएससीच्या नादात! पण साला, यूपीएससीची लत लागते, सोडवत नाही! मी आता पुस्तक लिहिणारे, ‘मन में है अविश्वास’. मिलिंद जो बोलत सुटला, तो थांबेचना!
- यूपीएससी क्रॅक करण्याच्या ध्यासानं झपाटून तारुण्य जाळणाऱ्या मुलामुलींच्या अखंड धास्तावलेल्या,अगतिक आणि चोहीकडून लुटल्या जाणा ऱ्या आयुष्याची दिल्लीच्या कुबट, गजबजत्या गल्ल्यांमध्ये कोंबून भरलेली चित्तरकथा..

DOWNLOAD FREE SAMPLE
Not sold yet? Download the preview sample (PDF, 2.8 MB) complete with cover artwork, table of contents, and several sample pages.