या वर्षीच्या मैफलीत भेटा…

Key Highlights

अल्याड-पल्याड

भारत-चीन सीमेवरच्या बुमला पासपर्यंतच्या थरारक प्रवासाची, सैनिकांच्या रक्ताने रंगलेल्या मातीची, भेटलेल्या आणि न भेटलेल्या माणसांची कहाणी!

पहाडाच्या काठावर एक खुणेचा विशाल खडक रोवलेला- ‘रॉक ऑफ पीस’! त्याच्याशेजारी दोन सैनिक दुर्बीण घेऊन बसलेले. दोघांपैकी एकाचा डोळा अखंड त्या दुर्बिणीला लागलेला. दुर्बीण समोर रोखलेली... आम्हीही क्षणभरासाठी त्या दुर्बिणीला डोळे लावतो.. समोर दिसते ती चीनची भूमी? खरे तर नाही!!!

Order now

Shipping in India only

पहावे तिथे पहाडी सुळके. कुठे काळे दगड, तर कुठे पांढुरके भुरे.
वाटेत ठिकठिकाणी लष्कराचे तळ. जुने आणि नवे बंकर.

तैनात लष्करी जवान बाहेरचे अनोळखी चेहरे दिसले की, नजर रोखून बघतात, मात्र ओळख दिल्यावर अत्यंत प्रेमाने आगतस्वागत होते...

वाफाळलेला चहा-समोसे खाण्याचा आग्रह करीत होते.
जसजसे वर चढत होतो, श्वास घेणे कठीण होत चालले होते. या इतक्या विरळ हवेत हे जवान कसे काम करीत असतील? - नुसत्या कल्पनेनेही ऊर भरून यावा, असे वातावरण!

देशाच्या कानाकोपऱ्यांमधून आम्ही यंदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…

DOWNLOAD FREE SAMPLE

Not sold yet? Download the preview sample (PDF, 2.8 MB) complete with cover artwork, table of contents, and several sample pages.

PHOTO GALLERY