वय झालं, टक्कल पडलं, तरी थोडंही म्हणून न उणावलेलं ‘रजनीकांत’ हे रहस्य नेमकं काय आहे?
देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो इतका कमालीचा साधा कसा?
टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. सुपरस्टारपदाचे तामझाम मिरवत नाही, पार्ट्या करत नाही.
रंगरोगण थापून, वय लपवून फिरत नाही.
दक्षिणेचा हा महानायक उत्तरेत अगदी फाटक्या माणसासारखा हिमालयात तीर्थाटन करून येतो,
तेव्हा तिथे त्याला कोणीही ओळखत नाही.
सफेद लुंगी आणि शर्टातल्या कोणत्याही अण्णासारखाच तो दिसतो आणि तसाच राहतो-वावरतोही!
शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत या माणसामागे लोक एवढे वेडे का होतात?- एक तेवढाच वेडा शोध!