पानी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या निमित्तानं
महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या गावांमध्ये
भगभगत्या शिवारात भाजी-भाकरी खाताना, कुदळ-फावडी मारताना,
मातीनं भरलेली घमेली उचलताना एक सुपरस्टार जगतो त्या आयुष्याची कहाणी
आणि गावच्या माणसांकडून त्यानं गिरवलेल्या धड्यांचा वृत्तान्त :
खुद्द त्याच्याच शब्दांत!