दोघे संन्यासी. एक भगव्या वस्त्रांतला. एक शुभ्र वस्त्रांतला. त्यांच्याकडे योगासनं शिकायला येणाऱ्या साधकांसाठी चुलीवर कढई ठेऊन च्यवनप्राश बनवण्यापासून सुरुवात होते, आणि बघता-बघता दोघं त्यातून एक कंपनी उभी करतात. जागतिक मंदीवर मात करून त्या कंपनीचा ‘मार्केट शेअर’ एवढा वाढतो, की बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांना पळता भुई थोडी होते… हे कसं घडलं?
हरिद्वारच्या आश्रमात जाऊन बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याबरोबर झालेल्या दीर्घ संवादातून शोधलेली ‘पतंजली आयुर्वेद’च्या थक्क करणाया प्रवासाची कहाणी…
मराठीत प्रथमच!!!