बनारसमधल्या गंगेच्या धारेत डुलणाऱ्या बोटीवर रंगलेल्या गप्पांमध्ये
ही ख्यातनाम गायिका उलगडते आहे तिचे लहानपणीचे दिवस…
कपाटातल्या जपानी गुडियांची रहस्यं आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा श्रीमंत वारसा
पुढे वाहून नेताना पायाखाली आलेल्या घरंदाज वळणांची लयदार कहाणी!