या वर्षीच्या मैफलीत भेटा…

  • रतन टाटा

    भारतीय उद्योगविश्वातली सर्वात आदरणीय व्यक्ती उलगडते आहे
    ‘क्रिएटिव्हिटी’ विरुध्द ‘केऑस’च्या
    झगडय़ातून सुटण्याचे मार्ग.

  • प्रिसिला चान

    कॉलेजमध्ये वॉशरूमच्या रांगेत ‘त्यानं’ प्रपोझ केलं तो क्षण, मग ‘त्याच्या’शी लग्न,
    मग त्याचं ‘मार्क झुकेरबर्ग’च होणं, फेसबुकचे दिवस,
    अचानक आलेला आणि गरगरून टाकणारा पैसा, त्या संपत्तीच्या सोबतीनं जगण्याची सवय करताना उडालेली तारांबळ
    आणि मैक्स या चिमुकलीच्या जन्मानंतर बदलून गेलेलं दोघांचं आयुष्य !!!
    स्वत:ची नव्वद टक्क्याहून जास्त संपत्ती समाजकार्यासाठी वापरण्याचा संकल्प केलेल्या
    मार्क झुकेरबर्गची पत्नी, सहचारिणी आणि मैत्रीण सांगते आहे
    त्या दोघांबद्दल आणि जग बदलण्याच्या त्यांच्या स्वप्नाबद्दल!

  • विदूषी गिरीजा देवी

    बनारसमधल्या गंगेच्या धारेत डुलणाऱ्या बोटीवर रंगलेल्या गप्पांमध्ये
    ही ख्यातनाम गायिका उलगडते आहे तिचे लहानपणीचे दिवस...
    कपाटातल्या जपानी गुडियांची रहस्यं आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा श्रीमंत वारसा
    पुढे वाहून नेताना पायाखाली आलेल्या घरंदाज वळणांची लयदार कहाणी!

  • विक्कू विनायकराम

    अख्ख्या जगाला वेड लावणारे,
    आजही त्याच जुन्या ‘मड्रास’मधून स्वत:ची नवीकोरी बीएमडब्ल्यू चालवणारे आणि
    रात्री श्रीकृष्णासमोर आपले घटम घेऊन बसणारे एक हसरे आजोबा...
    दोन मातीचे घट आणि दहा बोटं एवढ्या श्रीमंतीवर
    ग्रैमी अवॉर्ड पटकावणाऱ्या जगद्विख्यात घटम वादकाच्या बेभान प्रवासाची सफर

  • प्रियंका चोप्रा

    तिला विचारलं,‘तू तिकडे पश्चिमेला गेलीस अमेरिकेतल्या हॉलीवूडमध्ये. तुला अवघड नाही गेलं हे प्रकरण?’
    तर ती पटकन म्हणाली, ‘मी कुठे गेलेय ‘तिकडे’? मी तर मराठीतून येतेय तुमच्या घरी या दिवाळीत!’
    स्वत:च्या कर्तृत्वावरल्या विश्वासाच्या बळावर हॉलीवूडमध्ये पाय रोवणाऱ्या
    आणि तरीही ‘देसी’ मातीत पाय घट्ट रोवून असलेल्या
    एका महत्त्वाकांक्षी तरुण अभिनेत्रीशी खास भेट

  • रस्किन बॉण्ड

    मसूरीजवळचं लैण्डोर... देवदाराच्या गच्च सावलीतून वळणावळणानं वर चढणाऱ्या
    रस्त्याच्या कोपऱ्यावरल्या इमारतीत उघडी असलेली एकच खिडकी...
    आणि हिमालयाच्या प्रेमात पडून गेली अनेक वर्षं तिथं राहणारे, भुतांच्या गोष्टी सांगून मुलांना हसवणारे,
    ‘रस्टी’च्या कहाण्यांनी रानफुलांच्या पायवाटांवरून भटकायला नेणारे गोबऱ्या गालांचे हसरे मिश्कील आजोबा...
    द नेम इज बॉण्ड... रस्किन बॉण्ड!!
    - मसूरीला जाऊन केलेल्या गप्पा मराठीत प्रथमच!!!

Key Highlights

NH44

3745 किलोमीटर्स, 11 राज्यं, 35 दिवस आणि 7 पागल भटके

कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंतचा प्रवास... 35 दिवसांची, 34 रात्रींची रोडट्रीप...
त्या प्रवासात भेटलेल्या गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या आणि
बदलत्या माणसांच्या कहाण्या!!

Order now

Shipping in India only

माणसं रस्त्यावर का उतरतात?
- ‘सिस्टीम’शी भांडायला?

आम्हीही उतरतो आहोत रस्त्यावर! ऐन पंचविशीत पोचलेल्या
‘ग्लोबल’ भारताची ‘लोकल’ रहस्यं शोधायला!!

नव्या जगात नवे मार्ग शोधण्याची हिंमत धरणाऱ्या रस्त्यावरच्या माणसांशी बोलून!!
त्यांच्याबरोबर राहून, जेवून-खावून, भटकून !
शांत संथ कन्याकुमारीतून निघून थेट उकळत्या श्रीनगरपर्यंतचा
उभा भारत पालथा घालणारा रोमांचक प्रवास…

DOWNLOAD FREE SAMPLE

Not sold yet? Download the preview sample (PDF, 2.8 MB) complete with cover artwork, table of contents, and several sample pages.

PHOTO GALLERY

Testimonials